संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने वीज वाहिन्यांचा दोष आहे अथवा भारनियमन सुरू केले आहे, याबाबत खुलासा स्पष्ट करण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसापासून नेरूळ पश्चिम परिसरात लाईट जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. रात्रीच्या वेळेसही दोन ते चार तास लाईट गेलेली आहे. त्यामुळे महावितरणने भारनियमन (लोडशेडींग) सुरू केले असल्याचे स्थानिक रहीवाशांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे महावितरणने खरोखरीच भारनियमन (लोडशेडींग) सुरू केलेले आहे का? याचा लेखी स्वरूपात खुलासा करणे आवश्यक असल्याचे गणेश भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
भारनियमन (लोडशेडींग) सुरू केले असले तर नेरूळ पश्चिमेला कोणत्या विभागात, कोणत्या सेक्टरमध्ये कोणत्या वेळेला व किती वेळ लाईट नसणार आहे याचे वेळापत्रक महावितरणने स्थानिक रहीवाशांच्या माहितीस्तव प्रकाशित करणे आवश्यक आहे. कारण त्या वेळापत्रकानुसार घरातील, दुकानातील कार्यक्रमांचे नियोजन ठरविणे शक्य होणार आहे. घरातील पाणी भरणे, स्वयंपाक करणे, लादी, धुणी-भांडी आदी कामाच्या वेळा ठरविणे घरातील महिलांना शक्य होईल. व्यावसायिकांना त्या कालावधीत आपली दुकाने बंद ठेवणे शक्य होईल. भारनियमन (लोडशेडींग) सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. कडाक्याच्या उन्हाने रहीवाशी, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले त्रस्त झाली आहेत. त्यातच घरातील लाईट गेल्याने आजारी माणसांना यातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे भारनियमन (लोडशेडींग) सुरू केले असल्यास महावितरणने सर्वप्रथम वेळापत्रक जाहिर करावे आणि पुढील मे महिना पाहता भारनियमन (लोडशेडींग)चा कालावधी कमी असावा अथवा भारनियमन (लोडशेडींग) पूर्णपणे बंद करावे अशी मागणी गणेश भगत यांनी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहर भारनियमनमुक्त (लोडशेडींग) असावे म्हणून महावितरणने काही वर्षापूर्वी अंदाजे ४३ते ४७ पैसे प्रत्येक युनिटमागे आकारण्यास सुरूवात केली होती. भारनियमन (लोडशेडींग)ची समस्या त्यावेळी नष्ट झाली असली तरी अतिरिक्त आकारले जाणारे पैसे मात्र महावितरणने ग्राहकांना परत केले नाही. आता महावितरणने भारनियमन (लोडशेडींग) सुरू केल्यास प्रत्येक युनिटमागे ग्राहकांना अंदाजे ४३ ते ४७ पैसे कमी करणे आवश्यक आहे. भारनियमनमुक्तसाठी (लोडशेडींग) महावितरण प्रत्येक युनिटमागे अतिरिक्त पैसे आकारू शकते, तर भारनियमन (लोडशेडींग) सुरू झाल्यास ग्राहकांना प्रत्येक युनिटमागे काही पैशांची सवलत देणे आवश्यक आहे. भारनियमन (लोडशेडींग) सुरू केले असल्यास महावितरणने त्याचे नेरूळ पश्चिमला विभाग, सेक्टरनुसार वेळापत्रक जाहिर करावे, जर भारनियमन (लोडशेडींग) नसेल तर सातत्याने जात असलेल्या लाईटमुळे रहीवाशांना होत असलेल्या त्रासातून त्यांची मुक्तता करावी अशी मागणी गणेश भगत यांनी केली आहे.
00000000000000000000000 00000000000000000000000000
नवी मुंबई लाईव्हचे कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट ३०७/३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प), नवी मुंबई