• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 18, 2022

महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या कबड्डी संघाचे जिल्हास्तरीय यश

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या कबड्डी संघाचे जिल्हास्तरीय यश

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील – Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६

नवी मुंबई : आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची ओळख क्रीडा नगरी म्हणूनही व्हावी याकरिता विविध खेळांचे प्रशिक्षण देऊन गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये महानगरपालिकेचे विविध खेळांतील संघ जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम यश संपादन करीत असून नुकत्याच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, जयशंकर क्रीडा मंडळ कल्याण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये नवी मुंबई महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्र अ गटाच्या संघाने तृतीय क्रमांक संपादन करून स्वत:च्या कर्तबगारीची नाममुद्रा उमटविली.

नवी मुंबई महापालिका संघाने ठाणे जिल्हयातील जुन्या व बलाढ्य संघांना पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत छत्रपती क्रीडा मंडळ, डोंबिवली संघाने २५-२० अशा ०५ गुण फरकाने नवी मुंबई महानगरपालिका संघावर विजय मिळविला त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा संघ स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. नवी मुंबई महानगरपालिका संघातील खेळाडू हे कुमार गटात खेळणारे खेळाडू असुनसुद्धा या स्पर्धेमध्ये वरिष्ठ “अ” गटात खेळून त्यांनी क्रीडाप्रेमींची मने जिंकली. महानगरपालिका संघातील खेळाडू कु. अफ्ताब हसनेत मन्सुरी याने दिवसातील उत्कृष्ट चढाईपटू म्हणून तर २७ एप्रिल रोजीचा सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून सुनील राठोड यांचा वैयक्तिक पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या संघातील कुमारवयीन खेळाडूंनी या अ गटातील स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या संघातील खेळाडू दिपक श्रीराम केवट याची ५ ते ८ मे २०२२ या कालावधीत पुणे येथे होणार्‍या कुमार गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेकरिता ठाणे जिल्हा संघात निवड झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघाने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा व सांस्कृतिक कार्य. विभागाचे उपआयुक्त मनोजकुमार महाले यांनी संघाचे

अभिनंदन करीत पुढील काळात आणखी चांगली कामगिरी करून अंतिम विजेतेपद संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव हे व्यवस्थापक असून रविंद्र सकपाळ यांच्या प्रशिक्षणाखाली नवी मुंबई महानगरपालिका संघाने हे उज्वल यश संपादन केलेले आहे.

अशाप्रकारे कबड्डीसह विविध खेळांमध्ये उत्तम कामगिरी करीत नवी मुंबई महापालिकेच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालत असल्याबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विजेत्या कबड्डी संघाचे कौतुक करीत त्यांना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Previous Post

पावसाळापूर्व नाले व गटारे सफाई कामाची आयुक्तांकडून पाहणी

Next Post

उद्यानातील बंद पडलेली संगीत यंत्रणा कार्यान्वित करा : विद्या भांडेकर

Next Post
कॉंग्रेसच्या पाठपुराव्यामुळे उद्यानाच्या तुटलेल्या दरवाजाची दुरूस्ती

उद्यानातील बंद पडलेली संगीत यंत्रणा कार्यान्वित करा : विद्या भांडेकर

प्रभाग ९६  मध्ये तातडीने वृक्षछाटणी अभियान राबवा : गणेश भगत

प्रभाग ९६  मध्ये तातडीने वृक्षछाटणी अभियान राबवा : गणेश भगत

सिडकोतर्फे कांदळवन क्षेत्र हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण

सिडकोतर्फे कांदळवन क्षेत्र हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com