सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ या परिसरात तातडीने वृक्षछाटणी अभियान राबविण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. पावसाळा आता तोंडावर आला नसून पावसाळ्याला काल रात्रीपासून सुरूवातही झाली आहे. प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ मध्ये वृक्षछाटणी तातडीने होणे आवश्यक आहे. पावसाळ्यात झाडाच्या ठिसूळ व धोकादायक झालेल्या फांद्या पावसामध्ये अथवा वाऱ्यामध्ये खाली पडण्याची पर्यायाने पदपथावरून अथवा रस्त्यावरून जाणाऱ्या रहीवाशांना तसेच वाहनांना यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये वृक्षछाटणी अभियान लवकरात लवकर न राबविल्यास व त्यामुळे जिवित अथवा वित्त हानी झाल्यास त्यास पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार राहील. काल रात्रीपासून सुरु झालेला पाऊस व वारे पाहता या परिसरांमध्ये आपण लवकरात लवकर वृक्षछाटणी अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. ०००००००००००००० ००००००००००००००००००००० ००००००००००००००० ००००००००
कार्यालय : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील, शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई