सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ व ४ तसेच जुईनगर नोडमधील रस्त्यांची डागडूजी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २ व ४ आणि जुईनगर नोडमधील रस्त्यांची पाहणी केल्यास कोठे खड्डे तर कोठे डांबर उखडलेले तर कोठे डांबरी रस्त्याचा कच्चा रस्ता झालेला पहावयास मिळतो. यामुळे या परिसराला बकालपणा प्राप्त झाला असून वाहनचालकांना वाहने घेवून जाताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. पावसाळा आता अवघ्या काही तासावर आलेला आहे. अवकाळी पाऊस पडला आहे. पावसाळ्यात रस्ते खराव होतात. पाणी साचून राहील्यास वाहनचालकांना वाहने जपून न्यावी लागतात, तसेच रस्त्याजवळच्या पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यावर पाणी उडते. रस्त्यात पाणी साचून डासांना खतपाणी मिळते. पावसाळ्यात रस्त्यावरून कोणतीही समस्या निर्माण होवू नये यासाठी नेरूळ सेक्टर २ आणि ४ व जुईनगर नोडमधील रस्त्यांची पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी खड्डे बुजवून रस्त्यांची डागडूजी करावी अशी मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
०००००००००००००० ००००००००००००००००००००० ००००००००००००००० ००००००००
कार्यालय : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील, शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई : संपर्क : ८३६९९२४६४६, Navimumbailive.com@gmail.com