सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ मधील रहीवाशांना लवकरात लवकर निवडणूक ओळखपत्र देण्याची मागणी महापालिका निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे समाजसेवक गणेश भगत यांनी एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूकीत अधिकाधिक मतदान होणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. मतदानाचा कमी टक्का ही बाब भूषणावह नाही. महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ या परिसरातील रहीवाशांना अजूनही निवडणूकीचे ओळखपत्र मिळालेले नाही. ओळखपत्र नसल्याने मतदानापासून वंचित राहावे लागण्याची भीती स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक ओळखपत्र मिळाले नसल्याच्या तक्रारीही रहीवाशांकडून आमच्या कार्यालयात करण्यात आलेल्या आहे. नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ मधील रहीवाशांच्या निवडणूक ओळखपत्रासाठी विशेष अभियान लवकरात लवकर राबवून १८ वर्षावरील प्रत्येक मतदाराला ओळखपत्र उपलब्ध करून देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी केली आहे.
०००००००००००००० ००००००००००००००००००००० ००००००००००००००० ००००००००
कार्यालय : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील, शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई : संपर्क : ८३६९९२४६४६, Navimumbailive.com@gmail.com