संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ आणि ४ मधील महापालिका उद्यानातील बंद पडलेली संगीत यंत्रणा पूर्ववत सुरू करण्याची लेखी मागणी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे नेरूळ सेक्टर २ परिसरात छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सार्वजनिक उद्यान आणि नेरूळ सेक्टर ४ परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान आहे. या तीनही उद्यानात महापालिका प्रशासनाने कार्यान्वित केलेली संगीत यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त आहे. रहीवाशांना सकाळी संगीता कानावर पडत नसल्याने पर्यायाने भावगीते कानावर पडत नसल्याने सकाळी उद्यानात चालताना निरस वाटते. संगीत यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी स्थानिक रहीवाशांनी आमच्या कार्यालयात येवून समस्या कथन केल्या आहेत. स्थानिक करदात्या रहीवाशांच्या आग्रहास्तव या तीन उद्यानात बंद पडलेली संगीत यंत्रणा दुरुस्तीचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.