अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २४ परिसरात असलेले चिंचोली तलावालगतचे उद्यान आणि ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व सभोवतालच्या परिसरातील असुरक्षितता पाहता नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी नाराजी व्यक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनातून पोलीसांना तलाव, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व सभोवतालच्या परिसरात गस्त वाढविण्याची तर महापालिका प्रशासनाला सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात रविंद्र सावंत म्हटले आहे की, जुईनगर सेक्टर २४ मधील चिंचोली तलावालगत महापालिकेचे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे. या केंद्रामध्ये जुईनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. १५ जुनच्या रात्री ते १६ जुनच्या पहाटेपर्यत या वेळेदरम्यान ज्येष्ठ नागरिक केंद्रात चोरी झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही या केंद्रामध्ये व केंद्राच्या आवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरीच्या घटनांनी येथे एक प्रकारचे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या अंधारात येथे ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याच्या अथवा त्यांना घातापात करण्याच्या घटना घडण्याची भीती आहे. या केंद्रालगत असलेल्या उद्यानामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यत स्थानिक रहीवाशांचा वावर आहे. तेथेही लुटमारीच्या घटना घडण्याची भीती आहे. या ठिकाणी सीसीटीव्हीची व उद्यानासाठी सुरक्षा रक्षकांची गरज आहे. सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक नसल्याने येथील सुरक्षा वाऱ्यावर आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही असल्यास एक तर अनुचित घटना घडणार नाही व घडल्यास सीसीटीव्हीच्या माध्यमातून लवकर उलगडा होणे शक्य होईल. आपण येथील समस्येचे गांभीर्य पाहता स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यासाठी व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात, जुईनगर सेक्टर २४ मधील चिंचोली तलावालगत महापालिकेचे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे. या केंद्रामध्ये जुईनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. १५ जुनच्या रात्री ते १६ जुनच्या पहोटपर्यत या वेळेदरम्यान ज्येष्ठ नागरिक केंद्रात चोरी झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही या केंद्रामध्ये व केंद्राच्या आवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरीच्या घटनांनी येथे एक प्रकारचे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या अंधारात येथे ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याच्या अथवा त्यांना घातापात करण्याच्या घटना घडण्याची भीती आहे. या केंद्रालगत असलेल्या उद्यानामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यत स्थानिक रहीवाशांचा वावर आहे. तेथेही लुटमारीच्या घटना घडण्याची भीती आहे. या उद्यान व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रापासून हाकेच्या अंतरावर पोलीस बीट चौकी आहे. ही पोलीस बीट चौकी नेहमीच बंद असते. या उद्यानामध्ये व सभोवतालच्या परिसरात पोलीसांची गस्त वाढविणे आवश्यक आहे. या ठिकाणी ज्येष्ठांची वर्दळ पाहता त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. पोलीस गस्त वाढल्यास स्थानिक रहीवाशांना विशेषत: ज्येष्ठांना दिलासा मिळेल आणि अनुचित घटना घडणार नाही. समस्येचे गांभीर्य व होणाऱ्या चोऱ्या पाहता या ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.