अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवीन पुनर्रचनेतील महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावात पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दूषित पाणीपुरवठा समस्येचे निवारण करण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
संदर्भ : यापूर्वीही याच विषयावर १ जुन २०२२ रोजी तक्रारपत्र सादर केले होते. आपल्या कार्यालयाकडून cityengineer@nmmc.gov.in, Executive Engineer (Nerul) ee_nerul@nmmconline.com पत्र केवळ फॉरवर्ड झाले, समस्येचे निवारण झालेले नाही.
महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात जवळपास दीड महिन्यापासून पालिका प्रशासनाकडून रहीवाशांना व ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या समस्येमुळे रहीवाशांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. सतत दूषित पाणी प्यायल्याने ग्रामस्थ व रहीवाशी आजारी पडू लागले आहेत. पावसाळ्यात नवी मुंबईत साथीच्या आजाराचा उद्रेक होतो. पण हे आजार पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे होत आहेत. सतत दूषित पाणी प्यायल्याने जिवितहानी झाल्यास जबाबदारी कोण स्विकारणार? असा प्रश्न संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांना विचारला आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या पाणीपुरवठ्याची प्रशासनातील संबंधितांना चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत. पाणी दूषित येत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसापासून रहीवाशांकडून होत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून दूषित पाणी येत असल्याची तक्रार करूनही प्रशासनाकडून समस्येचे गांभीर्य समजून घेतले जात नाही. गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून दूषित पाण्याचा पुरवठा होऊ लागल्याने रहीवाशी चिंताग्रस्त झालेले आहेत. रहीवाशी पाणी गाळून, उकळून पाणी घेत असले तरी या दूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची व ते आजारी पडण्याची भीती आहे. दूषित पाण्यामुळे रहीवाशी भयभीत झाले आहेत. लवकरात लवकर दूषित पाण्याबाबत चौकशी करुन प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव येथील रहीवाशांना व ग्रामस्थांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याच समस्येबाबत संदीप खांडगेपाटील यांनी १ जुन २०२२ रोजी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असता, महापालिका आयुक्त कार्यालयाकडून cityengineer@nmmc.gov.in, Executive Engineer (Nerul) ee_nerul@nmmconline.com रोजी संबंधितांना केवळ पत्र फॉरवर्ड करण्यात आले. याशिवाय कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दूषित पाणी आजही येत आहे. पालिका प्रशासनाला समस्येचे गांभीर्य समजत नाही. दूषित पाणी सतत प्यायल्याने जिवितहानी झाल्याशिवाय पालिका प्रशासनाचे डोळे उघडणार नसल्याचा संताप संदीप खांडगेपाटील यांनी व्यक्त केला आहे.