अनंतकुमार गवई :
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गाव यामध्ये असणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्यांची तातडीने दुरूस्ती करून अंधाराची समस्या दूर करण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिकेच्या नवीन पुनर्रचनेतील प्रभाग ३४ मधील नादुरूस्त पथदिव्यांची व त्यामुळे निर्माण होणाऱ्या अंधाराच्या समस्येची समस्या आपणापुढे या निवेदनातून मांडत आहे असल्याचे संदीप खांडगेपाटील निवेदनात पुढे म्हटले आहे की, कुकशेत गावाच्या कोपऱ्यावर झुलेलाल मंदिराच्या विरूध्द दिशेला एक रस्ता थेट पामबीच दिशेने अॅक्रापॉलिस टॉवरकडे जातो. महापालिका कुकशेत गावच्या कोपऱ्यावर एक बहूउद्देशीय मार्केटचे काम करत आहे. त्या ठिकाणाहून वळसा घेवून आपण पामबीच मार्गावर अथवा सेक्टर सहामध्ये जाण्यासाठी त्या मार्गावरून जावे लागते. कुकशेत गावाच्या कोपऱ्यावर बांधकाम सुरू असलेले हे मार्केट ते नेरूळ सेक्टर सहामधील अॅक्रापॉलिस टॉवर यादरम्यान जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर गेल्या तीन चार दिवसापासून पूर्णपणे अंधार आहे. येथील पथदिवे बंदच असतात. बंद पथदिव्यामुळे एकीकडे नेरूळ सेक्टर सहाचा भाग आणि दुसरीकडे कुकशेत गावचा भाग अंधारात असतो. रात्रीच्या वेळी सुरू असलेला पाऊस, बंद पथदिव्यांमुळे पसरलेला अंधार तेथून कोणी दुचाकीस्वार जात असल्यास त्याच्या मागे रस्त्यावर असणारी मोकाट व भटकी कुत्री लागतात. एकीकडे बंद पथदिव्यांमुळे पसरलेला अंधार, दुसरीकडे वरून पडत असलेला पाऊस आणि त्यात मागे लागलेली कुत्री यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. दुचाकीस्वारांना इजाही झालेली आहे. त्यामुळे सेक्टर सहाचे रहीवाशी व कुकशेत गावचे ग्रामस्थ प्रशासनाप्रती संताप व्यक्त करत आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना तात्काळ या रस्त्यावर बंद असलेले पथदिवे दुरूस्तीचे निर्देश देवून येथील अंधाराची समस्या संपुष्ठात आणावी, ही आपणास नम्र विनंती.
आपले नम्र
संदीप खांडगेपाटील
संपर्क : ८३६९९२४६४६