समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांचा नव्या सरकारकडे पाठपुरावा
स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना तातडीने कोव्हिड भत्ता उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आदेश देण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसांपासुन नवी मुंबईत कोरोनाच्या नव्या रूग्णांचा आकडा वाढायला लागला असून हा आकडा गेल्या काही दिवसापासून ३०० पार गेला आहे, ही चिंताजनक बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोव्हिड भत्ता दिलेला आहे, अपवाद फक्त नवी मुंबई पालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचा. कोरोना महामारीच्या काळात व आताही मूषक नियत्रंण कर्मचारी कार्य करत आहेत. रात्र-दिवस मुषक नियत्रंण कर्मचारी काम करत असूनही पालिका प्रशासनाने इतरांना कोव्हिड भत्ता दिलेला असताना मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. एकतर मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कधीही वेतन वेळेवर मिळालेले नाही. ठेकेदार या कर्मचाऱ्यांना दोन ते चार महिने गेल्या काही वर्षापासून वेतन विलंबानेच देत आहे. अनेक वर्षे या कर्मचाऱ्यांनी अवघ्या ५ हजार हजार रुपये वेतनावर काम केल्यानंतर व या समस्या निवारणासाठी आणि कर्मचाऱ्यांना समाधानकारक वेतन मिळावे यासाठी केवळ मी एकट्याने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झालेली आहे. एरियससाठीही महापालिका प्रशासनाकडे व राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यावरच या कर्मचाऱ्यांच्या खात्यात एरियस जमा झालेला असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमध्ये काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळालेला नाही. कोव्हिड भत्ता मिळण्यास विलंब झाल्याच्या प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कोव्हिड भत्ता देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.