अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात तातडीने धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढीस लागला आहे. सांयकाळी ६ नंतर रहीवाशांना दारे-खिडक्या बंद करावी लागतात. डासांमुळे रहीवाशी त्रस्त झाले आहेत. मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजाराचा परिसरात उद्रेक होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रभाग १९ मध्ये पालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबवून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.