अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ विभाग कार्यालयातंर्गत येणाऱ्या नेरूळ, जुईनगर, शिरवणे, नेरूळ पूर्व, कुकशेत, सारसोळे, नेरूळ गाव व अन्य परिसरात तातडीने पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची लेखी मागणी नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सध्या गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईत संततधार पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे नेरूळ परिसरात काही ठिकाणी पदपथ निसरडे होण्यास सुरूवात झालेली आहे. अजून पाच-सहा दिवसांनी सर्वच भागातील पदपथ, उद्यानातील मॉर्निग वॉकच्या जागा निसरड्या होवून रहीवाशी चालताना घसरून पडण्याची शक्यता आहे. नेरूळ विभाग कार्यालयातंर्गत नेरूळ पूर्वचा परिसर, नेरूळ पश्चिम, जुईनगर, शिरवणे, सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ गाव या परिसराचा समावेश होत आहे. संततधार पाऊस पडत असल्याने पदपथावर तसेच उद्यानातील मॉर्निग वॉकच्या ठिकाणी शेवाळ साचण्याची शक्यता आहे. या ठिकाणी चालताना घसरून कोणती दुर्घटना होण्याआधी विभाग कार्यालयाने तातडीने संबंधित ठिकाणी असणाऱ्या तातडीने ब्लिचिंग पावडर फवारणी अभियान राबवून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.