नवी मुंबई : भाजप संचलित अखिल भारतीय माथाडी संघटनेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग आमले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माथाडी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी आमले यांना नियुक्तीपत्र दिले आहे. कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबईतील सानपाडा नोडमध्येच नाही महापालिका कार्यक्षेत्रात प्रभागातील जनतेसाठी सलग अडीच वर्षे सातत्याने सर्वाधिक कार्य करणारा भाजपचा युवा नेता अशी पांडुरंग आमलेंनी त्यांच्या कार्यातून ओळख निर्माण केलेली आहे. समाजातील त्यांचे कार्य व कामगार चळवळीतील योगदान, सक्रियपणा पाहून पांडुरंग आमले यांची माथाडी संघटनेकडून नियुक्ती करण्यात आली आहे.