नवी मुंबई : जनसेवक गणेश भगत आणि स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या वतीने २९ जुलै ते ३० जुलै २०२० दरम्यान भारतीय डाक विभागाची अपघात विमा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर स्थानिक रहीवाशांच्या सहकार्याने उत्साहात पार पडले.
शिबिरात एकूण २०१ नागरिकांनी पोस्टाकडे कागदपत्रांची पूर्तता करत अपघाती विमा योजना सुरू केली. तीन दिवसीय शिबिर यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी भारतीय डाक विभागाचे कर्मचारी वर्ग, सौ. विमल गांडाळ, छाया चव्हाण, सुनीता निमसे, समाजसेवक मंगेश राऊत, दिलीप राऊत, विनोद चाळके, सुनील गलांडे, पांडुरंग बेलापूरकर, लक्ष्मण कणसे, रमेश नार्वेकर, वासुदेव पाटील, सहादू सुकाळे, जालिंदर यादव, सुनील वायकर, राजु तुरे, रमेश बोऱ्हाटे, विजय पातेरे, सागर मोहिते, विकास तिकोणे, सूर्या पात्रा, मंगेश काटकर, शशिकांत जगताप, अशोक गांडाळ, संतोष शिंदे, राजेश घाडी, मयुर पवार यांनी विशेष सहकार्य केले.