स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailiv.com@gmail.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय पातळीवर तसेच व्यक्तिगतरित्या ‘हर घर तिरंगा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे ऐरोलीचे आमदार लोकनेते गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या जनसेवक गणेश भगत यांच्यांकडून नेरूळ पश्चिमला सेक्टर १६, १६ ए, १८ परिसरात घरोघरी जावून राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात येत आहे.
गुरूवारी दिवसभरात ६०० सदनिकांमध्ये जावून जनसेवक गणेश भगत यांनी राष्ट्रध्वजाचे वितरण केले असून दोन दिवसामध्ये सेक्टर १६, १६ ए, १८ परिसरातील सर्वच घरांमध्ये अजून दोन हजार राष्ट्रध्वजाचे वितरण करणार असल्याची माहिती जनसेवक गणेश भगत यांनी दिली. या अभियानात गणेश भगत यांच्यासोबत राष्ट्रध्वज वितरण अभियानात विकास तिकोणे, राजू तुरे, अशोक गांडाळ, सूर्या पात्रा, मयुर पवार, शुभम पाटणकर यांनी मेहनत घेतली आहे. प्रभागातील प्रत्येक घरामध्ये तिरंगा फडकावून राष्ट्राभिमानाची भावना ज्वलंत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे गणेश भगत यांनी यावेळी सांगितले.