स्वयंम न्युज ब्युरो : ९८२०००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या सारसोळे गावातील शाळेत तब्बल वर्षभर शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. त्यातच कोणी शिक्षक सुट्टीवर गेल्यास उर्वरित शिक्षकांना एकाच वेळी दोन ते तीन वर्ग सांभाळण्याची कसरत करावी लागत होती. पालकांनी व शाळेतील शिक्षकांनी याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांच्याकडे धाव घेतली. तालुकाध्यक्ष महादेव पवारांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दोन वेळा लेखी निवेदत देत समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यदिनापूर्वी सारसोळेच्या महापालिका शाळेला शिक्षक न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी शाळेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिला. रक्षाबंधनच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली असता, आयुक्त बांगर यांनी तातडीने समस्येची दखल घेत समस्या निवारणाचे पालिका शिक्षण मंडळाला निर्देश दिले. शक्रवारी (दि. १२ सप्टेंबर ) रोजी सारसोळेच्या महापालिका शाळेत पालिका प्रशासनाकडून शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला. वर्षभरापासून प्रलंबित सोडविल्यामुळे सारसोळेचे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहाचे रहिवाशांकडून महादेव पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महापालिकेच्या सारसोळे शाळेतील सातवीच्या वर्गावर शिकविणाऱ्या एका शिक्षकाला महापालिका मुख्यालयात शैक्षणिक कामकाजासाठी कोरोना काळात सप्टेंबर २०२१ मध्ये शिक्षण मंडळाने बोलावून घेतले आहे. तेथे संगणकीय कामकाज म्हणजेच थोडक्यात लिपिकाचे कामकाज या शिक्षकांकडून करवण्यात येते. सारसोळे शाळेतील एक शिक्षक असे शहराच्या इतर भागातून नवी मुंबई महापालिका शाळांतून जवळपास ७ शिक्षक मुख्यालयात शिक्षण मंडळामध्ये संगणकावर लिपिकाचे कार्य करत आहेत.
कोरोना महामारी आता पूर्णपणे आटोक्यात आली असून शाळाही सुरू झाल्या आहेत. तथापि शिक्षण मंडळाने या शिक्षकांना पुन्हा शाळेवर अध्यापन कार्यासाठी पाठविलेले नाही. त्यामुळे शाळेतील शैक्षणिक कार्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यातही आजारपण अथवा मुसळधार पाऊसामध्ये कोणी न आल्यास एका एका शिक्षकाला तीन वर्ग एकाच वेळी सांभाळावे लागतात. समस्येचे गांभीर्य पाहता विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी आपण संबंधित शिक्षकांना पुन्हा सारसोळेच्या शाळेत पाठवावे. संबंधित ७ शिक्षकांना त्या त्या शाळांमध्ये पुन्हा पाठवून त्या जागांवर लिपिक अथवा आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून भरती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी महादेव पवार यांच्याकडून करण्यात येत होती.
सारसोळे शाळेतील सातवीच्या वर्गावर शिकविणाऱ्या एका शिक्षकाला महापालिका मुख्यालयात शैक्षणिक कामकाजासाठी कोरोना काळात सप्टेंबर २०२१ मध्ये शिक्षण मंडळाने बोलावून घेतले आहे. तेथे संगणकीय कामकाज म्हणजेच थोडक्यात लिपिकाचे कामकाज या शिक्षकांकडून करवण्यात येते. सारसोळे शाळेतील एक शिक्षक असे शहराच्या इतर भागातून नवी मुंबई महापालिका शाळांतून जवळपास ७ शिक्षक मुख्यालयात शिक्षण मंडळामध्ये संगणकावर लिपिकाचे कार्य करत आहेत. कोरोना महामारी आता पूर्णपणे आटोक्यात आली असून शाळाही सुरू झाल्या आहेत. तथापि शिक्षण मंडळाने या शिक्षकांना पुन्हा शाळेवर अध्यापन कार्यासाठी पाठविलेले नाही. त्यामुळे शाळेतील शैक्षणिक कार्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यातही आजारपण अथवा मुसळधार पाऊसामध्ये कोणी न आल्यास एका एका शिक्षकाला तीन वर्ग एकाच वेळी सांभाळावे लागतात. समस्येचे गांभीर्य पाहता विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी संबंधित शिक्षकांना पुन्हा सारसोळेच्या शाळेत पाठवावे. संबंधित ७ शिक्षकांना त्या त्या शाळांमध्ये पुन्हा पाठवून त्या जागांवर लिपिक अथवा आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून भरती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे असे सांगत महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाला सारसोळेच्या महापालिका शाळा प्रवेशद्वाराजवळच स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
ही कोंडी फोडण्यासाठी व सारसोळेच्या महापालिका शाळेला शिक्षक मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पुढाकार घेतला. अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीचे नवी मुंबई सहकार सेल अध्यक्ष भोजमल पाटील, जिल्हा सरचिटणिस गुरुनाथ नाईक, नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांच्यासोबत पालिका आयुक्त आभिजित बांगर यांची भेट घेत सारसोळेच्या पालिका शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच महादेव पवारांनी उपोषण केल्यास जनसामान्यांमध्ये महापालिका शिक्षण विभागाची संभाव्य बदनामी टाळण्यासाठी तोडगा काढण्याची गावडे यांनी पालिका आयुक्त बांगर यांच्याकडे मागणी केली. महादेव पवार यांनीही समस्येचे गांभीर्य आयुक्त बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी तात्काळ संबंधितांना संपर्क करत सारसोळेच्या महापालिका शाळेत संबंधित शिक्षक उपलब्ध करून देण्याचे निर्देश राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासमोरच दिले. अवघ्या २४ तासात दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी सकाळी सारसोळेच्या महापालिका शाळेत संबंधित शिक्षक उपलब्ध झाल्याचे ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना पहावयास मिळाले.