जॅीवन गव्हाणे : Navimumbailive.com@gmail.com :९८२००९६५७३
नवी मुंबई : दरवर्षीप्रमाणे नेरूळ नोडमधील कुकशेत गावात दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार असून शुक्रवारी, १९ ऑगस्ट रोजी कुकशेत गावातील गांवदेवी मैदानात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
खुल्या गटामध्ये दहीहंडी फोडणाऱ्यास २५ हजार रूपये रोख पारितोषिक, पारंपारिक मानाची दहीहंडी फोडणाऱ्यास ५ हजार रुपये, दहीहंडीस सलामी देणाऱ्या पथकांना एक हजार रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
या दहीहंडी उत्सवामध्ये ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, बेलापुरच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, समाजसेवक गणेश भगत, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, माजी नगरसेविका रूपाली भगत, श्रध्दा गवस, स्नेहा पालकर, माजी परिवहन सभापती प्रदीप गवस यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभोवतालचे रहीवाशी व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
कुकशेत गावातील जय गजानन मित्र मंडळाकडून या दहीकाला उत्सव २०२२चे आयोजन करण्यात आले असून या उत्सवामध्ये दहीहंडी पथकांनी व नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक सुरज पाटील व पालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.