स्वयंम न्यूज ब्युरो : ८३६९९२४६४६ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २-४ आणि जुईनगर नोडमध्ये पदपथावर, उद्यानातील वॉकच्या ठिकाणावर तातडीने ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २,४ आणि जुईनगर नोड हा परिसर अत्यल्प उत्पन्न गटातील रहीवाशांपासून ते मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचा आहे. (काही टॉवरचा अपवाद वगळता). हा परिसर ९५ टक्के सिडको सदनिकाधारकांचा आहे. गेली अडीच महिने संततधार स्वरूपात मुसळधार पाऊस पडत असल्याने पदपथावर व उद्यानातील वॉकच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले आहे. अधिकांश ठिकाणी निसरडे झाले आहेत. या पदपथावरून चालताना तसेच उद्यानात चालताना अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला घसरून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यांना किरकोळ दुखापतीही झालेल्या आहेत. समस्येचे गांभीर्य ओळखून नेरूळ सेक्टर २,४ आणि जुईनगर नोडमधील पदपथावर तसेच उद्यानातील वॉकच्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.