नवी मुंबई : गणेशोत्सवापूर्वी महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात तातडीने ब्लिचिंग पावडर फवारणी अभियान राबविण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसराचा समावेश होत आहे. गेली तीन महिने संततधार स्वरूपात मुसळधार पाऊस पडत असल्याने पदपथ व उद्यानातील मॉर्निग वॉकची जागा निसरडी झाली आहे. ठिकठिकाणी शेवाळ दिसत आहे. रहीवाशांना पदपथावरून चालताना आणि उद्यानात मॉर्निग वॉक करताना स्थानिकांना घसरून पडल्याने जखमा झाल्या आहे. रहीवाशी पदपथाऐवजी चालण्यासाठी रस्त्याचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. गणेशोत्सवापूर्वी प्रभाग १९ मध्ये पदपथ व उद्यानातील मॉर्निग वॉकच्या जागेवर तातडीने ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे संबंधितांना आदेश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.