नवी मुंबई : सानपाडामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये विशेषत: लुटमारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होवू लागल्याने सानपाडा पोलिस स्टेशनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सानपाडा पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर तीन भामट्यांनी एका महिलेला लुटल्याची घटना घडल्याने पोलिसांविषयी सानपाडावासियांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तीन भामट्यांनी सानपाडा सेक्टर ७ मधील बिकानेरपासून एका महिलेला ढकलत ढकलत चौधरी मेडिकलजवळ आणले. तिथे रस्त्यावरच एका कोपऱ्यात महिलेला बसवून तिच्याकडील ८ तोळे सोने व सहा हजार रूपये रोख रक्कम हिसकावून घेत पलायन केले. याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी मिलेनिअमसमोरच सकाळी ७ वाजता एका महिलेला धमकावत तिच्याकडील दागिने हिसकावत दोघा भामट्यांनी पलायन केले होते. सानपाडा सेक्टर ७ परिसर भुरट्या चोरांचा माहेरघर बनत असून महिलांना लुटण्याच्या घटना याच परिसरात घडल्या आहेत. दिवसाढवळ्या गेल्या काही दिवसांपासून महिलांना लुटण्याच्या घटना घडत असताना चोरांचा शोध घेण्यास सानपाडा पोलिसांना अपयश आले आहे. भाजपचे सानपाडा नोडमधील पांडुरंग आमले यांनी सानपाडा पोलिसा ठाण्यात सानपाडा नोडमधील वाढत्या गुन्ह्यांबाबत यापूर्वीच निवेदन सादर करत चिंता व्यक्त केली आहे.