नवी मुंबई : प्रभाग ८५ मधील भाजपच्या माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि प्रभाग ८६ मधील भाजपच्या माजी नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी पालिका प्रशासन दरबारी केलेल्या अथक पाठपुराव्याची पालिका प्रशासनाला दखल घ्यावी लागली. दिपावलीमध्येच नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे व कुकशेत गावामध्ये रविवारी २३ ऑक्टोबर रोजी विकासकामांचा शुभारंभ होत आहे.
स्थानिक माजी नगरसेविका सौ. सुजाता पाटील व मा. नगरसेविका सौ. जयश्री ठाकुर यांच्या प्रयत्नाने मंजुर विविध नागरीकामांचा उद्घाटन सोहळा २३ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित केला आहे.
- नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नुतनीकरण प्रभागातील जेष्ठ नागरीक व महीलांच्या हस्ते सांयकाळी दुपारी ५.३० वाजता. २) नेरूळ सेक्टर ६ येथील रस्त्यांचे डांबरीकरण , दुपारी ५ वाजता शिवम सोसायटीसमोर. ३) सारसोळे गावातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा आवारातील मैदानात उभारलेल्या हायमास्टचे लोकार्पण ४०+ संघ सारसोळे गाव यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता. ४) कुकशेत गावातील रस्ते डांबरीकरण, दुपारी ४ वाजता गावदेवी मैदान गेटसमोर. ५) गावदेवी मैदान, कुकशेत गाव येथील पदपथ सुधारणा करणे, वेळ: दुपारी ४ वाजता. ६) भुखंड क्रमांक पी ५ ते भुखंड क्रमांक पी १४ पर्यंत गटर व पदपथ नुतनीकरण, कुकशेत गाव, प्रवेश द्वार क्रमांक २ समोर , वेळ दुपारी ४ वाजता. या सर्व कामांचा नियोजित विकासकामांमध्ये समावेश आहे. माजी नगरसेविका सुजाता सुरज पाटील आणि माजी नगरसेवक सुरज पाटील हे कामे करताना प्रसिध्दीपासून अलिप्त राहत असल्याने याही विकासकामांचा शुभारंभ प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
सभागृहात पाच वर्षे वावरताना प्रभागातील समस्यांबाबत केवळ पाठपुरावाच नाहीतर आक्रमकपणाही नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांनी दाखविल्याने प्रभाग ८५ मध्ये अनेक विकासकामे साकारली गेली असून नागरी समस्यांचे निवारणही झाले आहेत. पाणीसमस्या सोडविण्यासाठी सभागृहात जमिनीवर बसून प्रशासनाच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य सुजाता सुरज पाटील यांनी दाखविले होते. वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असलेल्या सुजाता पाटील प्रशासनाकडून नागरी कामे तसेच नागरी समस्यांचे निवारण करण्यात वाकबगार असल्याने प्रशासकीय राजवटीतही विकासकामांचा आलेख उंचावण्यात सुजाता पाटील यशस्वी ठरल्या आहेत.