नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये पालिका प्रशासनाकडून येत असलेल्या गढूळ पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. प्रभाग ३० मध्ये गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. ऐन दिवाळीमध्ये सानपाडावासियांना गढूळ पाणी पालिका प्रशासनाकडून मिळाले आहे. सानपाडावासिय पाणी सध्या गाळून व उकळून घेत असले तरी गढूळ पाण्यामुळे रहीवाशांवर आजारी पडण्याची टांगती तलवार कायम आहे. सभोवतालच्या नोडमध्ये चांगले व स्वच्छ पाणी येत असताना सानपाडा नोडमध्ये दूषित पाणी येत असल्याचा महापालिका प्रशासनाने शोध घेणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना गढूळ पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याचे संबंधितांना आदेश देवून सानपाडावासियांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.