नवी मुंबई : महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) अन्वये महानगरपालिकेने प्रारुप विकास योजना तयार करुन जनतेकडून सूचना व हरकती मागविणेसाठी प्रसिध्द केलेली आहे. सदर सूचना / हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक ३१/१०/२०२२ असा जाहीर करण्यात आलेला आहे.
सदर सूचना, हरकती दाखल करणे नागरिकांना सुविधाजनक व्हावे व त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता शनिवार दि. २९ ऑक्टोबर व रविवार ३० ऑक्टोंबर २०२२ रोजी कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही महापालिका कार्यालये सुरू असणार आहेत. ३१ ऑक्टोबर हा प्रारुप विकास योजनेविषयी हरकती / सूचना दाखल करणेकरिता अखेरचा दिवस असून नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी लक्षात घेऊन नागरिकांना सोयीचे व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयात तसेच नमुंमपा मुख्यालयातील नगररचना विभागात प्रारूप विकास योजनेविषयी जनतेच्या सूचना व हरकती स्विकारण्यासाठी कर्मचारी उपलब्ध असणार आहेत, याची नोंद घेण्यात यावी.