विठ्ठल ममताबादे
उरण : धनत्रयोदशी दिपावलीच्या पहिल्या दिवशी (२२ ऑक्टोबर) मॅजेस्टीक व्हीला, सेक्टर ५०, द्रोणागिरी नोड, ता. उरण येथील एम गोल्ड ज्वेलर्समध्ये एक अज्ञात इसम अग्निशस्त्रासारखे दिसणारे रिवाल्व्हॅर घेऊन जबरी चोरी करण्याची इराद्याने दुकानात जाऊन दुकानात काम करणाऱ्या मुलीस चुप बैठ,चुप बैठ असे बोलल्याने दुकानात हजर असलेल्या दुकान मालकाने सायरन वाजविल्याने दुकानात जबरी चोरीच्या इराद्याने घुसलेला इसम घाबरून दुकानातून बाहेर निघून दुकानाबाहेर असलेल्या इनोवा कारमध्ये बसून पळून गेला. सदर बाबत उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाचे तपासकामी बिपीनकुमार सिंह, पोलीस आयुक्त जय जाधव, सह पोलीस आयुक्त शिवराज पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पनवेल, धनाजी क्षीरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि विजय पवार, सपोनि प्रकाश पवार, पोलीस उप निरीक्षक चंद्रहार पाटील नेम. उरण पोलीस ठाणे, सपोनि गळवे, पनवेल तालुका पोलीस ठाणे, सपोनि निकम, न्हावाशेवा पोलीस ठाणे रूपेश पाटील, घनश्याम पाटील, शशिकांत घरत, नितीन गायकवाड, मच्छिंद्र कोळी, सचिन माळशिकारे (सर्वांची नेमणूक) उरण पोलिस ठाणे यांनी कोणताही सुगावा नसताना आरोपीत हे घटनास्थळावर येण्याचा व जाण्याचा मार्ग निश्चित करून सदर मार्गावरील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करून एम गोल्ड ज्वेलर्समध्ये जबरी चोरीच्या इराद्याने अग्निशस्त्रासारखे दिसणारे रिवाल्व्हर घेऊन आलेला इसम ज्या इनोवा कारमधून पळून गेला होता, त्या इनोवा कारचा नंबर एम एच ४३ एक्स ७०७७ असा नंबर असल्याचे दिसून आले.
सदर गाडीचे फास्टटॅगला संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरून गाडी मालकाची माहिती प्राप्त करून गाडी मालकाकडे २२ ऑक्टोबर रोजी गाडी कोणास दिली होती याबाबत माहिती घेतली. तेव्हा सदरची इनोवा कार चालक नामे अंकुश अश्रुबा जाधव (वय ४४ वर्षे, व्यवसाय-चालक, रा. ९ नंबर बिल्डींगच्या समोरील चाळ, बुध्द मंदिराचे बाजुला, संघर्षनगर, साकीनाका, मुंबई नं. ४०००७२) हा कल्याण अलिबाग भाडे असल्याचे सांगून गेला होता. चालक नामे अंकुश अश्रुबा जाधव यास ३० ऑक्टोबर रोजी सानपाडा, नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चैकशी केली असता त्याने पाहिजे आरोपी एजाज अब्दुल करीम चैधरी, रा. उल्हासनगर कॅम्प नं. ४ याचे सांगणेवरून इनोवा गाडी भाड्याने घेतली होती.
त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याचे सुमारास घटनास्थळी मॅजेस्टिक व्हीला येथे येऊन एम गोल्ड ज्वेलर्समध्ये जबरी चोरी करण्याचे इराद्याने अटक आरोपी व पाहिजे आरोपी घटनास्थळी आले असल्याचे सांगितले.
सदर गुन्ह्यातील आरोपी अंकुश अश्रुबा जाधव, बिलाल अब्दुल करीम चौधरी यांना ३१ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ वाजता अटक केली असुन न्यायालयाने त्यांना ८नोव्हेंबरपर्यत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. शंकर बनारसी चैरासिया ४ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६.३० वाजता अटक करण्यात आली असून ८ ऑक्टोबरपर्यत मा. न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली आहे.
अशिष उर्फ सुरज जिलेंदर सिंग या फरार आरोपींवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे या पोलीस आयुक्तालय हद्दीत ८ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचे तपासात आरोपीत यांनी वापरलेली अडीच लाख रुपये किंमतीची इनोवा कार (एम एच ४३ एक्स ७०७७) जप्त करण्यात आली असल्याची माहिती सुनिल पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई यांनी दिली आहे.