अनंतकुमार गवई : Navimumbalive.com@gmail.com
नवी मुंबई : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधत कॉंग्रेसच्या ब्लॉक कॉग्रेस नेरूळ कार्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार नेते व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नेरूळ काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात लहान मुलांच्या हस्ते यावेळी केक कापण्यात आला. मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी सौ सीमा वाघ, सौ रुपाली साळुंखे, सौ पुनम, काँग्रेस सचिव विनायक तळेकर ,संतोष पोळ आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.