अनंतकुमार गवई
नवी मुंबई : जगामध्ये रस्ते अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचा स्मरण दिन रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा , वाहतूक नियम तसेच अपघात न घडलेल्या व्यक्तीचा सन्मान करून साजरा नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई व नवी मुंबई शिव वाहतूक सेवा यांच्या वतीने जागतिक स्तरावर दरवर्षी नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार हा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ दिवस म्हणून यावर्षी रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी या दिवसाच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई सौ. हेमागिनी पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई गजानन गांवडे यांच्या मार्गदर्शन खाली नवी मुंबई शिव वाहतूक सेवा, नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिलिप आमले यांच्या संयुक्तपणे रस्ता सुरक्षा विषयक जनतागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सकाळी ठिक १० वाजता वाजता हुतात्मा बाबु गेणु रिक्षा स्टँड (सन्मान) रिक्षा स्टँड नेरूळ रेल्वे स्टेशन नेरूळ येथे प्रमुख उपस्थिती अनुप सानप व मोटार वाहन निरीक्षक परिवहन विभाग नवी मुंबई शिर्के सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक नवी मुंबई, शिव वाहतूक सेवाचे अध्यक्ष दिलिप किसनराव आमले, नवी मुंबई स्टँड प्रतिनिधी सचिन लाड, प्रणय तुडिलकर, नरेंद्र गुरव, नवनाथ कोतकर, धनंजय विश्वासराव, संजय दागडे, सुनिल पाटील, नंदु जाधव, राम बाबु, रामा पाटील, विष्णू ठोके या रिक्षाचालकानी एका वर्षात कुठल्याही प्रकारचा अपघात यांच्याकडून झालेला नाही नियमानुसार व्यवसाय करतात म्हणून अनुप सानप मोटार वाहन निरिक्षक नवी मुंबई व दिलिप आमले यांच्या हस्ते रिक्षाचालकांचा सन्मान करून उपस्थित सर्वच रिक्षाचालकांनी यावेळी ‘मी अपघात मुक्त आपले वाहन चालविल’, अशी प्रतिज्ञा केली तसेच रस्त्यावर अपघात मध्ये मुत्यु पावलेल्याना श्रदांजली वाहुन कार्यक्रम संपन्न झाला.