श्रेय मिळू नये म्हणून राजकीय विरोधकांचा केविलवाणा स्टंट : सौ.मंदा म्हात्रे
नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यात यावे, अशी जनतेची सातत्याने होणारी मागणी लक्षात घेता मी सदर हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न करीत होते. माझ्या प्रयत्नाला यश येऊन राज्य शासनाने याबाबत हिरवा कंदील दाखविला. परंतु याचे श्रेय मिळू नये याकरिता काही राजकीय विरोधक मैदान वाचवा प्रकरणाचे भांडवल करून केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मैदान वाचवा एक चांगली गोष्ट आहे, या भूमिकेच्या मी विरोधात नाही. सदर जागेवर असणारे मैदान हे बेलापूर, दिवाळे, आग्रोळी, किल्ले गावठाण, शाहबाज, फणसपाडा अशा ग्रामस्थांकरिता आरक्षित करावे, ही माझीच मागणी होती. याबाबतची महापालिका व सिडको प्रशासनाकडे केलेली सर्व पत्रव्यवहार माझ्याकडे आहेत. परंतु हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजची मागणी करून मी काही मोठा गुन्हा केला आहे का? असा सवाल आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित केला.
*** हम वो तीर है, जो हिमालय को चीरकर अपना रास्ता मै खुद बना सकती हू | कोई साथ दे या नही दे, फिर भी नवी मुंबई को मै हिला सकती हु |
राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, ते पाहता त्यांनी चालवलेला हा स्टंट असल्याचे नागरिक खाजगीत बोलत आहेत. महापालिकेने दुसरी १० एकर जागा हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजकरिता उपलब्ध करून दिली तरी मला काही हरकत नाही परंतु सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज ही काळाची गरज आहे. मैदानाला माझा विरोध नाही, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना सर्व सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे. बेलापूर ग्रामस्थांना मैदान आरक्षित करावे ही माझीच मागणी आहे, असे सांगत मैदानासाठी कोणत्या पुढाऱ्यांनी मागणी केली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हम वो तीर है, जो हिमालय को चीरकर अपना रास्ता मै खुद बना सकती हू | कोई साथ दे या नही दे, फिर भी नवी मुंबई को मै हिला सकती हु | असे म्हणत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केविलवाणा स्टंट करणाऱ्या राजकीय विरोधकांना इशारा दिला.