नवी मुंबई : नेरुळ सेक्टर ४ मधील महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानात बसविण्यात आलेली खेळणी तसेच ओपन जीमचे साहित्य नादुरुस्त झाल्याने ती दुरुस्त करावी अथवा नवीन बसविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व महापालिका शहर अभियंत्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर ४ मध्ये नवी मुंबई महापालिकेचे नेताजी सुभाषचंद्र उद्यान आहे. या उद्यानात सकाळी व सांयकाळी नेरूळ सेक्टर ४ मधील मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. या उद्यानात बसविण्यात आलेले व्यायामाचे साहित्य पूर्णपणे नादुरुस्त झाले असून वापरण्यायोग्य नाही. त्यामुळे ओपन जीममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या स्थानिक रहीवाशांची गैरसोय होत आहे. ओपन जीममध्ये बसविण्यात आलेले व्यायामाचे साहित्य निकृष्ठ दर्जाचे बसविण्यात आल्याने जनतेच्या पैशाची ही होत असलेली उधळपट्टी असून स्थानिक रहीवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. उद्याना बसविण्यात आलेल्या निकृष्ठ दर्जाच्या व्यायामाच्या साहित्याविषयी उच्चस्तरीय चौकशी करावी व हे निकृष्ट साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून नवीन साहित्य व तेही चांगल्या दर्जाचे पुनश्च बसून घेण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी निवेदनातून केली आहे.
स्तानिक रहीवाशांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर ओपण जीममधील साहित्य बदली करून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, असेही विद्या भांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.