• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 27, 2022

चोऱ्यांना आळा बसण्यासाठी पोलीस गस्त वाढवा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर २-४सह जुईनगर नोडमध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : विद्या भांडेकर

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २,८, १० परिसरात होत असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गस्त वाढविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी एका निवेदनातून नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

गेल्या काही महिन्यापासून नेरुळ सेक्टर २,८,१० परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. जुईनगर, नेरूळ या ठिकाणी रस्त्यावर एका बाजूला उभ्या असणाऱ्या रिक्षाच्या बॅटरी व टायर चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. निवासी वास्तव्य असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पार्किगला जागा नसल्याने अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांना आपल्या उपजिविकेचा कणा असणाऱ्या रिक्षांना रस्त्यावर उभे करावे लागत आहे. सकाळी व्यवसायावर जाण्यासाठी रिक्षाजवळ आल्यावर टायर तसेच आतील बॅटरी चोरीला गेल्याचे निदर्शनास येत असल्याचे विद्या भांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

रस्त्यावर तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात उभ्या असलेल्या सायकली, मोटरसायकली व अन्य वाहनेही चोरीला जाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. सोसायटी आवारात जागा नसल्याने लाखो रुपये किंमतीची वाहने रस्त्यावर उभी असतात. ही वाहने बेवारस नसून जागेअभावी तिथे उभी असतात. पोलिस गस्त वाढल्यास रस्त्यावरील वाहने चोरीला जाणार नाही. भुरट्या वाहनचोरांनाही दहशत बसेल. तसेच २४ तास कोणी आपले दरवाजे बंद करुन ठेवत नाही. घरात महिला स्वयंपाक करत असताना घराचे दरवाजे उघडे राहील्यास बाहेरील कोणी भामटा, चोरटा घरात दरवाजाजवळ चॉर्जिगला असलेले अथवा जवळपास टेबलवर असलेले मोबाईल चोरी करुन पळ काढतात. निवासी परिसरात भुरट्या चोरांचा उद्रेक वाढीस लागला आहे. सतत होत असल्याने चोऱ्यांनी रहीवाशी त्रस्त झाले आहेत. हे भुरटे चोर मोबाईल तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षातील टायर व बॅटरी चोरताना स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेला आव्हान देऊ लागले आहेत. रहीवाशांना दिलासा देण्यासाठी व वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी या परिसरात गस्त वाढवावी तसेच खबऱ्यांच्या माध्यमातून भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.

Previous Post

ओपन जीममध्ये नव्याने व्यायामाचे साहित्य बसवा : विद्या भांडेकर

Next Post

शेकापच्या पाठपुराव्याने साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू

Next Post
शेकापच्या पाठपुराव्याने साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू

शेकापच्या पाठपुराव्याने साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू

महाराष्ट्राची रक्तवाहिनी सरकारने वाचवली पाहिजे

कर्तृत्व की कुंडली ?

सानपाडा सेक्टर सातमधील उद्यानांतील झोपाळे दुरुस्त करा : पांडुरंग आमले

सानपाडा सेक्टर सातमधील उद्यानांतील झोपाळे दुरुस्त करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com