नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ सेक्टर सहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.
रविवार, दि. ११ डिसेंबर रोजी नेरुळ सेक्टर सहामधील कंत दर्शन दरबारमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा सौ. सलुजा संदीप सुतार या रक्तदान शिबिराच्या उद्घाटक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी या शिबराला मोठ्या प्रमाणावर भेट देत आहेत. तालुकाध्यक्ष पद गेल्यावरही एक कार्यकर्ता म्हणून महादेव पवार हे नेरूळ पश्चिम नोडमध्ये कार्यरत असून पक्षवाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असल्याची चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरु आहे. सध्या समाजातील आरोग्य व्यवस्थेला रक्ताची गरज असून इच्छूक रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन आयोजक महादेव पवार यांनी केले आहे.