परेल येथे २५ डिसेंबरला आयोजन
कुडाळ, न्यु शिवाजी हायस्कूल जांभवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाच्यावतीने माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी शिरोडकर हायस्कूल, परेल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ः३० या वेळेत दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी विद्यार्थी संघाचे प्रसिध्दी प्रमुख सुर्यकांत चव्हाण व अध्यक्ष शरद साळगावकर यांनी दिली आहे.
संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना अध्यक्ष श्री साळगावकर म्हणाले, न्यु शिवाजी हायस्कूल जांभवडेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज विखूरलेले आहेत. त्यांना माजी विद्यार्थी संघाच्या प्रवाहात सामिल करुन जांभवडे पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरित करणे हा आहे.
यासाठी २५ डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ९.३० वाजता प्रस्तावना, दीपप्रज्वलन, १० वाजता पाहुण्यांचा परिचय व माजी जेष्ठ विद्यार्थ्यांचे स्वागत, स्तुती-स्तवन गायन, साडेदहा वाजता मान्यवरांचे सत्कार, ११ वाजता संघाच्या दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन, साडेअकरा वाजता संघाची भूमिका, उद्दिष्टे व भविष्यकालीन उपक्रमाची माहिती, दुपारी साडेबारा वाजता माजी विद्यार्थ्यांची मनोगते होतील. यावेळी डॉ. मंगेश घाडीगावकर हे माजी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करतील. पावणे एक वाजता अध्यक्षीय भाषण, दीड वाजता स्नेहभोजन, २.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ३.३० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, साडेचार वाजता पैठणी लकी ड्रॉ, सायंकाळी ५ वाजता उपस्थितांचे आभार व सव्वापाच वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या स्नेहमेळाव्याला माजी विद्यार्थी, माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाच्या वतीने अध्यक्ष शरद साळगावकर, सचिव विजय पतवाने, खजिनदार प्रसाद गुरव यांनी केले आहे.