संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : गेल्या काही वर्षापासून नवी मुंबई महापालिका, एमआयडीसी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, सिडको तसेच खासगी आस्थापनेतील कंपन्या व कारखान्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कामगार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनची नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाशी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांशी संबंधित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत हे महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियनने महापालिका प्रशासनातील आरोग्य विभाग, परिवहन विभाग तसेच कंत्राटी विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने महाराष्ट्र कर्मचारी युनियशी संलग्न होत त्यांनी युनियनचे सदस्यत्व स्विकारले आहे.
महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या कंत्राटी विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांची युनियनच्या नेरूळ सेक्टर २ येथील कार्यालयात शनिवारी सांयकाळी बैठक झाली. या बैठकीत कामगारांच्या समस्या व असुविधा यावर चर्चा होवून त्यावर पुढील रणनिती ठरविण्यात आली. या बैठकीला युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत व युनियनचे सचिव मंगेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांशी संबंधित वाहन चालक, सफाई कामगार, आया व अन्य कर्मचारी वर्गाने यापूर्वीच मोठ्या संख्येने युनियनचे सदस्यत्व स्विकारलेले आहे.
कंत्राटी कामगारांशी संबंधित जाहिर झालेल्या कार्यकारिणीमध्ये गोपीनाथ पुंडलिक पाटील हे नवी मुंबई अध्यक्ष, अक्षय गोपीनाथ जाधव हे नवी मुंबई उपाध्यक्ष, नवी मुंबई सरचिटणिसपदी अजय प्रकाश पवार यांची निवड करण्यात आली. ऐरोलीतील राजामाता जिजाऊ माता बाल रुग्णालयाच्या युनिट अध्यक्षपदी गणेश पाटील, उपाध्यक्षपदी हेमंत म्हात्रे, कार्याध्यक्षपदी रितेश वैती, सचिवपदी अमित पाटील, सहसचिव नितीन केदारे, खजिनदार राजेश सकपाळ यांची निवड करण्यात आली.
बेलापुरमधील माता बाल रुग्णालयाच्या युनिट अध्यक्षपदी नकुल म्हात्रे, उपाध्यक्षपदी गोपाल राठोड, सारिका राजगुरु यांची तर तुर्भे माता बाल रुग्णालयाच्या युनिट अध्यक्षपदी भाऊ लोंढे, उपाध्यक्षपदी सुजाता दिवेकर यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेताना युनियनने कर्मचारी समस्या सोडविण्यासाठी केलेल्या कामाची माहिती दिली. या बैठकीत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. युनियनचे सचिव मंगेश गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.