नवी मुंबई : बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त (२० जानेवारी) सानपाडा नोडमधील आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कट्टर समर्थक व भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी सानपाड्यात क्रिकेट स्पर्धा, मोफत अष्टविनायक दर्शन, हळदीकुंकू समारंभासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
१३,१४,१५ जानेवारीदरम्यान सानपाडा येथील राणी लक्ष्मीबाई क्रिडांगणावर साईभक्त चषक या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्याला ६० हजार रुपयांचे रोख पोरितोषिक व चषक, उपविजेत्याला ३५ हजार रुपये व चषक तर तिसऱ्या क्रमाकांसाठी १५ हजार रुपये व चषक देण्यात आला. सानपाडा विभागातील रहीवाशांसाठी १७ व १८ जानेवारीदरम्यान मोफत अष्टविनायक सहलीचे आयोजन केले आहे. १९ जानेवारी रोजी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे व आर नाईक इव्हेटसच्या माध्यमातून सेक्टर ८ येथील खेळाच्या मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सानपाडा नोडमधील समस्या व असुविधा सोडविण्यासाठी स्थानिक आमदार व आमच्या मार्गदर्शक तसेच मातृतुल्य नेतृत्व असणाऱ्या मंदाताई म्हात्रे या सातत्याने आम्हाला सहकार्य करत असतात. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सानपाडावासी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. नवी मुंबईकरांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमांचे आयोजक व सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी केले आहे.