Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : सिडकोने लवकरात लवकर वाशीतील नियोजित भुखंडावर महाराष्ट्र भवनचे काम सुरू करावे अन्यथा महाराष्ट्रातील जनतेकडून वर्गणी गोळा करुन लोकवर्गणीतून महाराष्ट्र भवनचे काम सुरु करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
वाशी येथे महाराष्ट्र भवनसाठी भुखंड आहे. या शहरात अनेक राज्यांनी स्वत:चे भवन बांधले आहेत. परंतु महाराष्ट्राच्या भूमीवर महाराष्ट्र भवनची निर्मीती आजतागायत झाली नाही. बांधकाम अजूनही सुरु झालेले नाही. या कामाला सिडको दिरंगाई करत असल्याची खंत व्यक्त करत लवकरात लवकर महाराष्ट्र भवनचे काम सुरु करण्याची मागणी नामदेव भगत यांनी केली आहे. या निवेदनाची एक प्रत नामदेव भगत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सादर करणार असल्याचे यावेळी सांगितले.