अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१०, सारसोळे गाव, कुकशेत गावातील गृहनिर्माण सोसायट्या, चाळी, एलआयजीमधील अंर्तगत भागात धूरफवारणी सातत्याने करण्याची लेखी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती व प्रभाग ८५च्या माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव तसेच कुकशेत गाव परिसराचा समावेश होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग ३४ मध्ये डासांचा उद्रेक वाढल्याने स्थानिक रहीवाशी तसेच सारसोळे व कुकशेतचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सांयकाळनंतर डासांच्या त्रासामुळे त्यांना घराची दारे-खिडक्या बंद करुन बसण्याची वेळ आली आहे. डासांमुळे मलेरिया, ताप, डेंग्यू आदी साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची टांगती तलवार आहे. नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील तसेच सारसोळे व कुकशेत गावातील गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात, चाळींमध्ये, एलआयजीच्या अंर्तगत भागात डासांचा त्रास संपुष्ठात येत नाही, तोपर्यत नियमितपणे धुरीकरण करण्यात यावे. रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होत असल्याने रात्रीच्या वेळीच धुरीकरण करण्याची स्थानिक रहीवाशी व ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य, डासांचा त्रास, साथीच्या आजाराची भीती पाहता आपण प्रभाग ३४ मध्ये धुरीकरण अभियान राबवण्याविषयी संबंधितांना देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याच समस्येबाबत सुजाता पाटील यांनी ४ जानेवारी रोजीही महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले होते.