अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानात ओपन जीम सुरु करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिकेच्या नेरूळ सेक्टर दोनमधील परिसरात सिडको वसाहती व खासगी गृहनिर्माण सोसायट्या आहेत. याच परिसरात भुखंड क्रं १ वर महापालिका प्रशासनाने सार्वजनिक उद्यान विकसित केलेले आहे. या उद्यानात नेरूळ सेक्टर दोनसह जुईनगर परिसरातील रहीवाशी या उद्यानात येत असतात. या उद्यानात पालिका प्रशासनाने ओपन जीम सुरु केल्यास नेरूळ व जुईनगरच्या रहीवाशांना त्या माध्यमातून व्यायाम करता येईल. अन्य उद्यानाच्या धर्तीवर याही ठिकाणी ओपन जीम सुरु करण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून आमच्याकडे सातत्याने करण्यात येत आहे. त्याच मागणीचा आम्ही आपणाकडे लेखी निवेदनातून पाठपुरावा करत आहोत. रहीवाशांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना लवकरात लवकर या उद्यानात ओपन जीम सुरू करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.