अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडावासियांकरता नागरी आरोग्य केंद्रात माफक प्रमाणावर बुस्टर डोस उपलब्ध करुन देण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमध्ये समाविष्ट होणाऱ्या सानपाडा, सानपाडा पामबीच या भागातील अनेक रहीवाशी आजही बुस्टर डोसपासून वंचित आहे. कोरोना महामारी आटोक्यात आली असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. बाहेरील देशांममध्ये कोरोना उद्रेकाच्या बातम्या आजही वाचनात येतात. सानपाडा नोडमधील रहीवाशी अनेकदा बुस्टर डोससाठी नागरी आरोग्य केंद्रात विचारणा करावयास गेल्यास बुस्टर डोस नसल्याचे उत्तर त्यांना मिळते. पालिका प्रशासनाकडे कोव्हिड डोसचा सर्व डाटा उपलब्ध आहे. त्यात बुस्टर डोस न घेतलेल्यांची माहिती असणार. त्यामुळे समस्येचे गांभीर्य व रहीवाशांची मागणी पाहता सानपाडा नागरी आरोग्य केंद्रामध्ये सानपाडावासियांकरता माफक प्रमाणावर बुस्टर डोस उपलब्ध करुन देण्यासाठी संबधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.