अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारतीय जनता पार्टीचा ४३वा वर्धापन दिन उत्सव नेरूळ सेक्टर २ परिसरात भारतीय जनता युवती मोर्चाच्या नवी मुंबई अध्यक्षा सौ. सुहासिनी नायडू यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.
पक्ष नही ये परिवार है, हर भारतीय का जयजयकार है या ब्रीदवाक्याला समर्पित होत पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सौ. सुहासिनी नायडू यांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त सौ. सुहासिनी नायडू यांनी नेरूळ सेक्टर दोन मधील आपल्या जनसंपर्क कार्यालयावर पक्ष ध्वज फडकावून अंत्योदयाचा वसा घेतलेल्या या संघटनेच्या उभारणीसाठी योगदान घेतलेल्या सर्व नेत्यांना अभिवादन केले. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक व सर्व महिला कार्यकर्त्यां यांच्या हस्ते पक्ष ध्वजारोहण करून पूजन करण्यात आले व विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा केंद्र चार बेंचेस सौ. सुहासिनी नायडू यांनी उपलब्ध करून दिले. पक्ष वर्धापन दिनानिमित्त त्या बेचेंसही लोकार्पण करण्यात आले. पक्ष वर्धापन दिन सोहळ्याला सर्व पक्ष कार्यकर्ते व स्थअनिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सौ. सुहासिनी नायडू यांनी त्यांचे आभार मानले.