अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८,१८ए, २४, नेरूळ गाव परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची लेखी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या एप्रिल महिना सुरु झाला असून अनेक शाळांच्या तसेच महाविद्यालयांच्या परिक्षाही संपल्या आहेत. अनेक परिवार गावी जावू लागले आहेत. घराघरांना टाळे लागले आहेत. पुरूष वर्ग जरी कामावर ये-जा करत असले तरी ते रात्रीचेच घरी असतात. अनेक घरातील पुरूष वर्षांतून एकदा परिवारासोबत गावी जावे म्हणून त्याही सदनिका १२-१५ दिवस बंद असतात. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आताच सदनिकांना टाळे लागले आहेत. उन्हाळ्यात लगीनसराई असल्याने गावी जावेच लागते. त्यामुळे या बंद घरांमध्ये घरफोड्या होण्याची भीती अधिक असते. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्याच्या कालावधीत गृहनिर्माण सोसायट्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत आपण परिसरात मार्गदर्शन करावे. आम्ही आपणास जे जे सहकार्य लागेल ते करू. सकाळ, दुपार, संध्याकाळ, मध्यरात्री व पहाटेच्या वेळी नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८,१८ए, २४, नेरूळ गाव परिसरात पोलिस गस्तीचे प्रमाण वाढवावे. स्थानिक रहीवाशांना विश्वासात घेवून गस्ती पथकांची स्थापना करावी. आम्ही आपणास सर्व सहकार्य करू. उन्हाळ्याच्या कालावधीत घरफोड्यांचे व चोऱ्यांचे प्रमाण पाहता नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८,१८ए, २४, नेरूळ गाव परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी केली आहे.