अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ पश्चिम नोडमधील सामाजिक कार्यकर्त्या व नवी मुंबई रेशनिंग कमिटीच्या माजी सदस्या सौ. संगिता दिलीप आमले यांची शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेली २० वर्षे नेरुळच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात संगिता आमले यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. नेरूळ सेक्टर सहामधील सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक नवरात्रौत्सव या पाठोपाठ अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्यांचे सक्रिय योगदान राहीले आहे. परिसरात रस्ता, पदपथ स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांमुळेच आपला परिसर स्वच्छ राहतो, बकालपणा व रोगराईला थारा मिळत नाही यामुळे दरवर्षी सफाई कामगारांना रक्षाबंधनला राखी बांधून व भाऊबीजेला ओवाळून संगिता आमले त्यांच्या कार्याचा गौरव करत असतात. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांनी त्यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती केली आहे.