अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २,४, जुईनगर नोड व शिरवणे गावातील बाहेरील, अंर्तगत रस्त्यावर, चौकाचौकामध्ये तसेच सार्वजनिक उद्यान, क्रिडांगण या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरुळ सेक्टर २,४ तसेच जुईनगर नोड आणि शिरवणे गावात चोऱ्यांचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढीस लागले आहे. चेन स्नॅचिंगच्या घटनाही घडत आहेत. याशिवाय रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांशी छेडछाड, विनयभंग आदी प्रकार घडत आहेत. नेरूळ सेक्टर २ मधील एलआयजी परिसरात नेहमीच चोऱ्या होत असतात. या ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यास घटनांचा शोध घेणे व गुन्हेगारांची ओळख पटविणे सहज शक्य होणार आहे. नेरुळ सेक्टर २,४ तसेच जुईनगर नोड आणि शिरवणे गावातील बाहेरील, अंर्तगत रस्त्यावर, चौकाचौकामध्ये तसेच सार्वजनिक उद्यान, क्रिडांगण या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, यासाठी आम्ही आपणास हे निवेदन सादर करत आहोत. समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक घरे बंद असतात. उपरोक्त उल्लेख केलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने अपप्रवृत्तींचे, चोरांचे, गुन्हेगारांचे आजवर फावले आहे. सीसीटीव्ही बसल्यास अनेक घटनांना आपोआपाच आळा बसेल, गुन्हेगारांचा शोध घेणे शक्य होईल, तरी समस्येचे गांभीर्य आणि स्थानिक रहीवाशांची मागणी पाहता आपण नेरुळ सेक्टर २,४ तसेच जुईनगर नोड आणि शिरवणे गावातील बाहेरील, अंर्तगत रस्त्यावर, चौकाचौकामध्ये तसेच सार्वजनिक उद्यान, क्रिडांगण या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून या परिसरातील रहीवाशांना दिलासा द्यावा असे विद्याताई भांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त कार्यालयाकडे याच विषयावर लेखी पाठपुरावा अनेकदा केलेला आहे. आयुक्त कार्यअलयाकडून केवळ संबंधितांकडे समस्येची निवेदन फॉरवर्ड करण्याचे काम केले जाते, परंतु कार्यवाही झाली नसल्याचे सांगत समस्येचे गांभीर्य समजून घ्या. उद्या मोठी दुर्घटना घडल्यावर पालिका सीसीटीव्ही बसविणार आहे का? नेरूळ चार येथे वाधवा टॉवर ते स्मशानभूमी मार्ग यादरम्यान नालाकम खाडीच्या बाजूला रस्त्यालगत पालिका प्रशासनाने बसविलेल्या लोखंडी जाळ्याही नुकत्याच चोरीला गेल्या आहेत. चोरीच्या घटनांनी रहीवाशी त्रस्त झाले आहेत. सीसीटीव्हीच्या मागणीला न्याय देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.