स्वयंम न्यूज फिचर्स :navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिवाळे गाव आणि आमदार सौ. मंदाताई म्हात्रे हे समीकरण ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात परिचित आहे. दिवाळे गावात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यातून व परिश्रमातून साकारत असलेल्या विकासकामांचे उद्घाटन व नवीन विकासकामांचे भूमीपुजन नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी होत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्याचे ध्येय मनाशी बाळगले आहे. प्रशासनाच्या माध्यमातून ते ध्येय साकारण्याचे अभियान देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. त्यालाच अनुसरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गावांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘गाव दत्तक योजना’ अभियान सुरू केले आहे. याच गाव दत्त्क योजनेच्या अंर्तगत समार्ट व्हिलेज दिवाळे गावाला बनविण्यासाठी पालिका आयुक्तांच्या हस्ते भूमीपुजन सोहळा व लोर्कापण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी, सांयकाळी ६ वाजता दिवाळे गाव, सेक्टर १४ येथील मच्छिमार्केट जवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून उदघाटन डोलकर मच्छिमार संस्थेकरिता निवारा शेड व स्टोर रूम, जेष्ठ नागरिकांकरिता २ गजेबो व बहुउद्देशीय इमारत,संगणक प्रशिक्षण केंद्र ग्रंथालय, व्यायाम शाळा या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्मार्ट व्हिलेज व दत्तक गाव योजना जाणून घेण्यासाठी व दिवाळे गावातील विकासकामांमध्ये सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमास नवी मुंबईकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.