- दोन बॅचेसना प्रशिक्षण
- सौ. रूपाली भगत यांचा पुढाकार
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील जनतेसाठी नवी मुंबई महापालिका आणि स्थानिक नगरसेविका मा. सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या संयुक्त विद्यमाने विभागिय जनतेसाठी मोफत कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. मोफत शिकविण्यात येणाऱ्या कोर्सेसमध्ये सहभागी होवून स्वबळावर उभे राहून व्यवसाय करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे या हेतूने स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी पुढाकार घेत महापालिकेच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर १६ मधील जनसंपर्क कार्यालयात ब्युटिशियन कोर्स महिलांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या ब्युटिशियन कोर्सच्या दोन बॅचेस झाल्या असून ६० महिला आता व्यवसाय करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
महापालिका प्रशासनाकडून महिलांनी, युवकांनी स्वबळावर उभे राहावे यासाठी वेगवेगळे तब्बल ३८ अभ्यासक्रम मोफत शिकविण्यात येत आहे. प्रभाग ९६ मधील महिलांनी अभ्यासक्रम शिकून स्वबळावर उभे राहावे यासाठी प्रभागातील महिलांमध्ये नगरसेविका रूपाली भगत गेल्या काही वर्षापासून जनजागृती करत आहेत.
यंदाही ब्युटिशियन अभ्यासक्रमासाठी महिलांना सहभागी करून घेत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून दोन बॅचेस घेण्यात आल्या. या महिलांना अभ्यासक्रम शिकविण्यात आला. या महिलांना, मुलींना अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, ३ वर्षाचा रहीवाशी दाखल या कागदपत्रासह एक फोटोची आवश्यकता आहे. नगरसेविका रूपाली भगत या पालिका प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अभ्यासक्रम घेणार असून यासाठी नावनोंदणी करण्यासाठी इच्छूकांनी अशोक गांडाळ (८३६९१४७७९७) आणि सागर मोहिते (८३६९६४१९४६) यांच्याशी संपर्क साधावा व विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती जाणून घ्यावी असे आवाहन मा. नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांनी केले आहे.