नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावातील दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार थेट घरी जावून करण्याचे अभियान भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्याकडून शुक्रवारपासून (दि. १६ जुन) सुरू झाले आहे. भाजपचे युवा नेते व नगरसेवक सुरज बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेल्या अनेक अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहे.
नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर या दोन्ही नगरसेविका गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांचे अभिनंदन करताना त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार करताना पालकांचेही अभिनंदन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रमाने, बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळविले असले तरी त्यामागे पडद्यामागून पालकांनी बजाविलेली भूमिका व परिश्रम याचेही योगदान मोलाची भूमिका बजावत असल्याचे नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी सांगितले.
सौ. सुजाता सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्यासोबत यशवंत तांडेल, सौ. सीमा चौधरी या अभियानात विसेष योगदान देत आहेत.