नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू सोसायटी (विक्रम बारलगत) ते शिवालिक सोसायटीपर्यतच्या पदपथावरील कचरा तातडीने हटवून बकालपणा संपुष्ठात आणण्याची लेखी मागणी प्रभाग ८५च्या माजी नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात आपण सीव्हयू सोसायटी (विक्रम बारलगत) ते शिवालिक सोसायटी (महावितरणचे विद्युत उपकेंद्र) यादरम्यान पदपथाची पाहणी केल्यावर गेल्या काही दिवसापासून पदपथावर असलेला कचरा व त्यामुळे परिसराला निर्माण झालेला बकालपणा निदर्शनास येईल. परिसरात महापालिका प्रशासनाने अजून वृक्षछाटणी अभियान न राबविल्याने वरूणा सोसायटीलगतच्या संरक्षक भिंतीलगतचे एक झाड पडून वाहनाचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे वाहनांची तसेच जिविताची हानी झाल्यावर महापालिका प्रशासन वृ एक झाड पडून हानी झाल्यावर महापालिका प्रशासन वृक्षछाटणी अभियान राबविणार आहे का?, असा प्रश्न माजी नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे.
सीव्हयू सोसायटी (विक्रम बारलग) ते शिवालिक सोसायटी (महावितरणचे विद्युत उपकेंद्र) यादरम्यान महावितरणने केलेल्या खोदकामाचे डेब्रिज, दोन दिवसापूर्वी पडलेले झाड, वाऱ्याने पडलेल्या नारळाच्या फांद्या व अन्य कचरा लांबवर विखुरलेला पहावयास मिळत आहे. यामुळे परिसराला बकालपणा आला असून पदपथाचा स्थानिक रहीवाशांना वापरही करता येत नाही. त्यांना रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असल्याने त्यांना ये-जा करणारी वाहने चुकवत जीव मुठीत घेवून वावरावे लागत आहे. पाऊसात त्या झाडाच्या फांद्यांचा कचरा कुजल्याने दुर्गंधीही येवू लागली आहे. परिसराचा बकालपणा संपुष्ठात आणण्यासाठी तसेच पदपथ जनतेला चालण्यासाठी मोकळे व्हाव्यात यासाठी आपण नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू सोसायटी (विक्रम बारलगत) ते शिवालिक सोसायटीपर्यतच्या पदपथावरील कचरा तातडीने हटविण्याचे निर्देश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी केली आहे.