नवी मुंबई : नवी मुंबई शहरामध्ये कोणत्याही रिक्षाचालकाला कसलीही मदत लागली तर मला कळवा, मी आपणास पूर्ण सहकार्य करेल. शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आपल्या प्रत्येक रिक्षाचालकाला सहकार्य करतील. लवकरच नवी मुंबईतील युनियनचे नेत्यांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून नवी मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात ज्या रिक्षाचालकांच्या अडचणी आहेत. त्याबाबत सविस्तर चर्चा करणार असे विजय नाहटा यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात प्रामुख्याने सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई विभागात शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या विजय नाहटा फाउंडेशनच्या विशेष सहाय्याने विजय नाहटा यांच्या हस्ते नवी मुंबई तील शेकडो रिक्षा चालकांना पावसाळी रिक्षाचे मोफत पडदे वाटप सानपाडा या ठिकाणी शिवशंकर रिक्षा स्टॅन्ड निवारा शेडचे उद्घाटन केले.
यावेळी माजी उपमहापौर अशोक गावडे, रोहिदास पाटील उपजिल्हा प्रमुख, अजित सावंत उपजिल्हाप्रमुख, रामा शेठ वाघमारे उपजिल्हाप्रमुख, दीपक सिंग उपजिल्हाप्रमुख, रामचंद्र पाटील सह संपर्कप्रमुख, सौ सुरेखा गव्हाणे बेलापूर विधानसभा शहर संघटक तसेच चित्रपट अभिनेते गणेश झेंडे उप शहरप्रमुख, चोरगे उपविभाग प्रमुख व विसाजी लोके माजी परिवहन सदस्य तसेच ज्यांच्या सहकार्याने निवारा शेड बनले. अविनाश जाधव उपजिल्हा युवासेना, कार्यक्रम आयोजक रिक्षा चालकांचे नेते दिलीपदादा आमले , रिक्षा युनियन पदाधिकारी जयराम पाटील, दिनेश शेटे, राजाराम सैद, अरुण कासकर, अजित शेख, अर्जुन डुकरे, हर्षद तांडेल, दिनेश लांडगे तसेच विभागातील शिवसेनेचे विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख शिवसैनिक व सानपाडा नेरळ जुईनगर विभागातील अनेक रिक्षा चालक तसेच अबोली महिला रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामुळे शेकडो रिक्षा चालक व उपस्थित नागरिकांनी विजय नाहटांचे मनापासून आभार मानले. रिक्षाचालक हा जनतेच्या सेवेसाठी असतो आणि तो रिक्षाचालक रात्री अपरात्री कधीही आपण बोलवल्यास आपली रिक्षा घेऊन येतो म्हणून ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून नवी मुंबईत ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं निवारा शेड पाहिजे, त्या त्या ठिकाणी शेड बनवून दिले जाईल अशी ग्वाही विजय नाहटा यांनी दिले आहे. या कार्यक्रमात विजय नाहटा यांनी मार्गदर्शन करतेवेळी सर्वप्रथम दिलीपदादा आमले व अविनाश जाधव यांचं कौतुक केले. कार्यक्रम ठिकाणी २०० ते २५० रिक्षा चालकांना पावसाळी पडद्याचे वाटप विजय नाहटा व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटण्यात आले