स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी ‘वसुधैव कुटुंबकम् करिता योग’ या संकल्पनेवर आधारित ‘आंतराष्ट्रीय योग दिवस’ वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने आयोजित विशेष कार्यक्रमात बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह नमुंमपा अधिकारी, कर्मचारी तसेच ७५० हून अधिक योगप्रेमी नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते. योगप्रशिक्षक प्रमोद कोकणे यांच्यासह सर्वांनी विविध योगप्रकार करीत आत्मिक शांती व समाधानाचा अनुभव घेतला.