• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 21, 2023

बेलापूर ते पेंधर दरम्यान लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बेलापूर ते पेंधर दरम्यान लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता २१ जून २०२३ रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून सीएमआरएस प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. यामुळे लवकरच बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्ग क्र. १ वर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.

सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर श्री. अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय

संचालक, सिडको यांनी मार्ग क्र. १ वरील मेट्रो स्थानकांना भेट दिली. सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत, नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एकूण ४ उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. १ च्या अंमलबजावणीचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फे मार्ग क्र. १ च्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोच्या मेट्रो मार्ग क्र. १ च्या अंमलबजावणीसाठी सिडकोला आयसीआयसीआय बँकेकडून  ५०० कोटींचे वित्त पुरवठा प्राप्त झाला आहे. तसेच सिडकोच्या २०२२-२३ या वर्षीच्या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पाकरिता समर्पित जमीन वाटपित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाचे चलनीकरण होऊन प्रकल्पासाठी वित्त पुरवठा सुकर होणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये मार्ग क्र. १ वरील पेंधर ते सेंट्रल पार्क या ५ स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले

होते. आता मार्ग क्र. १ वरील बेलापूर ते पेंधर स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे लवकरच संपूर्ण मार्ग क्र. १ प्रवासी वाहतुकीकरिता कार्यान्वित होणार आहे. नवी मुंबई मेट्रो लाईन १ च्या यशस्वी परिचालनासाठी सिडको सज्ज आहे. परिचालनाची सर्व व्यवस्था केली असून महामेट्रोची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मेट्रो प्रवासी दर निश्चित करून कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे.

0000

नवी मुंबई मेट्रोच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा सर झाला आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवी मुंबईकरांकरिता बेलापूर ते पेंधर मार्गिकेवर लवकरच मेट्रो सेवा सुरू होणार आहे. अनेक अडीअडचणींवर मात करून बहुप्रतीक्षित अशी नवी मुंबई मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे.”

श्री. अनिल डिग्गीकर

उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

 

Previous Post

वंडर्स पार्क नूतनीकरण कंत्राटात करोडोंचा भ्रष्टाचार : सविनय म्हात्रेंचा आरोप  

Next Post

ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त तीन सुट्टया जाहिर

Next Post
ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त तीन सुट्टया जाहिर

ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त तीन सुट्टया जाहिर

शिवसेना ठाकरे गटाच्या पाठपुराव्याने अर्धवट पुलाचे काम मार्गी लागणार

शिवसेना ठाकरे गटाच्या पाठपुराव्याने अर्धवट पुलाचे काम मार्गी लागणार

गटारांवरील धोकादायक झाकणे तातडीने बदला : पांडुरंग आमले

गटारांवरील धोकादायक झाकणे तातडीने बदला : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com