स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ३ मधील पदपथावरील गटारांची धोकादायक झालेली झाकणे तातडीने बदलण्यासाठी निर्देश देण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ३ परिसरात पदपथावर असलेली गटारावरील झाकणे धोकादायक स्थितीत आहेत. पादचाऱ्यांचा चालताना पाय जरी पडला तरी ती झाकणे तुटून पादचाऱ्यांना जखमा होण्याची भीती आहे. दिवसाउजेडी पादचारी चालताना काळजी घेतात. पण रात्रीच्या वेळी अपघात होण्याची भीती आहे. सानपाडा सेक्टर ३ परिसरात प्लॉट नं ४ , रॉयल स्नॅक्सशेजारी साईसंगत बिल्डींग, शॉप क्रं २८ या ठिकाणी महापालिका प्रशासनाने बसविलेली गटारावरील झाकणांची दुरावस्था झाली असून ती धोकादायक स्थितीत आहेत. पादचाऱ्यांचा पाय पडला तरी पादचारी त्या झाकणासह गटारात पडण्याची भीती आहे. आपण समस्येचे गांभीर्य पाहता सानपाडा सेक्टर ३ परिसरातील गटारांवरील सिमेंटच्या झाकणाविषयी पाणी अभियान राबवून धोकादायक अवस्थेतील झाकणे तातडीने बदलण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. पाऊस आता सुरू होईल. निसरड्या झालेल्या पदपथावरून साचलेल्या पाण्यातून ये-जा करताना झाकणावर पाय पडल्यास दुर्घटनेची दाट शक्यता आहे. त्यामुळे सानपाडा सेक्टर ३ मधील गटारावरील झाकणाबाबत पाहणी अभियान राबवून खराब झालेली, तुटलेली, धोकादायक अवस्थेत असलेली झाकणे तातडीने बदलण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.