स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महारेल विभागास सायन पनवेल महामार्गावरील अर्धवट पुलाबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवकांनी पीडब्ल्यूडीकडे पाठपुरावा केल्यामुळे लवकरच या अध्रवट पुलाचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती शिवसेना टाकरे गटाचे युवा नेते व सानपाडामधील माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी दिली. प्रसिद्धीमाध्यमातून पाठपुराव्याला प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांच्या सहकार्याचे योगदान यात मोठे असल्याचे सोमनाथ वास्कर यांनी यावेळी सांगितले.
१४ जुन २०२३ रोजी शिवसेना ठाकरे गटाने महारेल विभागास सायन पनवेल महामार्गावरील अर्धवट पुलाबाबत दिलेल्या पत्राची दख़ल पीडब्लूडी विभाग ( अभियंता ऋषिकेश कासार ) व महारेल ( श्री. अमित सर )व्यवस्थापणानी घेतली व त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या पत्राबाबत चर्चेसाठी पीडब्ल्यू डी कार्यालय तुर्भे येथे निमंत्रित केले होते. या बैठकीसाठी उपस्थित शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विट्ठल मोरे, महिला जिल्हासंघटक सौ.रंजना शिंत्रे , उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सानपाडा ग्रामस्थ दिगंबर पाटिल व .प्रल्हाद ठाक़ुर यांच्या समक्ष येत्या महीनाभरात सदर पादचारी पुलाच्या कामास सुरूवात करण्यात येइल असे वचन पीडब्लूडी व महारेल अभियंतानी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळास दिले व जोपर्यंत पादचारी पुलाचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत नवीन उड्डान पुल वाहतुकीसाठी सुरू करु नये अशी मांगणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली असता त्यास अभियंताने होकर दर्शविला असुन , सदर पादचारी पुल जुईनगर सर्विस रोड ( सानपाडा नाका ) पर्यंत करण्याची मागणीस संमती दर्शविली असल्याची माहिती माजी नगरसेवक व युवा नेते सोमनाथ वास्कर यांनी दिली.
सानपाडा आर टी ओ सर्कल मार्गे सानपाडा जुईनगर सर्विस रोड कड़े वाहनधारकास होत असलेल्या अड़चणी वरील उपाययोजना पर्याय महापे धर्तीवरिल अंडरपास ची निर्मिती करावी अशी सुचना केली असता महापे अंडरपास पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. अर्धवट पादचारी पुलाच्या बातमीस सातत्याने पत्रकारांनी प्रसिद्धि दिली. त्यामुळेच हा विषय मार्गी लागत असल्याचे सांगत सर्व पत्रकारांचे व समस्त ग्रामस्थांचे सोमनाथ वास्कर यांनी आभार मानले.